Friday, August 9, 2019

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पूरग्रस्तांना दिली मायेची चादर.

पाटण दि.०९ तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबाना बेघर व्हावे लागले आहे. पाटण शहरात पूर आल्याने अनेक कुटुंबाना आपले घर सोडून इतरत्र आसरा घ्यावा लागला .या सर्वांची राहण्याची सोय प्रशासन व स्थानिकांच्यावतीने  पाटण येथील साळुंखे हायस्कूलमध्ये करण्यात आली होती. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे पाटण शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करत होते व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देत होते.यावेळी त्यांच्या लक्षात आले की , अतिवृष्टीमुळे थंडी प्रचंड प्रमाणात जाणवत आहे, त्यावेळी त्यांनी पाटणकर गटाच्या संस्था व स्वखर्चाने विक्रमसिंह पाटणकर यांनी एका तासात 250 चादरी उपलब्ध करून दिल्या. याशिवाय नगरपंचायत तसेच अन्य संस्था यांच्यावतीनेही या पुरबाधित लोकांनां सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाळा, तसेच आता पूर ओसरल्यानंतर शहरातील स्वच्छता, आरोग्यविषयक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पाटण मध्ये पूर ओसरल्यानंतर तात्काळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. यात पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक तृप्ती सोनावणे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन नाना क्षीरसागर, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, राष्ट्रवादी ययुवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव शेडगे, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, माजी उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, रवींद्र सोनावणे आदी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Monday, August 5, 2019

पाटण शहरातील पूर परिस्थितीची माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची पदाधिकाऱ्यांसह पहाणी व अवाहन.

दि . 4  ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात व महाबळेश्वर खोऱ्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेले पाणी यामुळे कोयना व केरा नदीचे पाणी शहरात घुसल्याने स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान व गैरसोय निर्माण झाली आहे. या आपत्तीला सामोरे जाताना शासकीय यंत्रणा व पाटण नगरपंचायत यांनी  सतर्क राहून ग्रामस्थांना सहकार्य करावे. त्यांना आवश्यक सेवा सुविधा पुरवून त्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी.पाटण शहराला पाणी पुरवठा करणारी पिण्याच्या पाण्याचा उपसा योजना पाण्याखाली गेल्यामुळे पाटण शहरातील नागरीकांनी पिण्याचे पाणी जपून वापरण्याचे अवाहन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
     कोयना धरणातून सोडण्यात आलेले महाकाय पाणी व पाटण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पाणी घुसल्याने त्याठिकाणची पहाणी शासकीय यंत्रणा व पाटण नगरपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत विक्रमसिंह पाटणकर यांनी केली. व याबाबत सतर्क रहाण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना केल्या.
    यावेळी तहसीलदार रामहरी भोसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, माजी उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, नगरसेवक विजय टोळे,उमेश टोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी नागरीकांनी व पाटण नगरपंचायतीने पाणी, आरोग्य, स्वच्छता,ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर याची खबरदारी घ्यावी अशा सूचना विक्रमसिंह पाटणकर यांनी केल्या.